ताज्या घडामोडी

महागांव : दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत.

महागांव : दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत.

 

 

 

महागांव : दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसाने ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतातील ज्वारी, तीळ पीक, केळी.पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान जमिनी दोस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठे मोठे वृक्ष, विद्युत पोल तुटून पडलेले आहेत. काही ठिकाणी तर अजूनही रस्त्यांवर झाडे पडून असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत

 

आहे. या पावसाने तालुक्याला झोडपले असून शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *