परभणी येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस भरचौकात फाशी द्या
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा सह विविध संघटनांची मागणी
प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे
परभणी येथील दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांविरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करून खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनांच्या पदाधिकाऱ्याने महामहीम राज्यपाल यांच्याकडे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत निवेदनातून केली आहे.
दि. 23 मार्च 2025 रोजी परभणी शहरात एका गरीब कुटुंबातील दहा वर्षीय बालीकेवर विकृत मानसिकतेच्या हैवानांनी गुंगीचे मादक औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेचा तीव्र निषेध करून सामाजिक संघटनांनी विकृत प्रवृत्ती कडून महिलांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे सावित्रीच्या लेकी असुरक्षित आहेत.




