दत्त जयंती निमित्त दीपमाळ प्रकाश मय करून पूजा संपन्न
(चर्मकार समाजाने भावी भक्तांनसाठी ठेवला होता भोजनाचा कार्यक्रम )
ढाणकी प्रतिनिधी :
चर्मकार समाजाने नेहमी समाजाला प्रकाश देण्याचे काम केले आहे. त्यांना पेशवाईच्या काळात राजा महाराजांनी चर्मकार समाजाकडे गावातील सण आणि उत्सव मध्ये मंदिरात निवद देण्यासाठी लोकांना अंधारात रस्ता दाखवण्यासाठी दिवटी घेऊन जाण्याची जीमेदारी दिली जात होती असं जुन्या लोकांनकडून बोल्या जाते .
प्राचीन काळात दीपमाळ अस्तित्वात येण्याआधी मंदिर प्रांगणात उंच जागी दिवे लावण्याची प्रथा अस्तित्वात होती. मंदिरासमोर दीपमाळा बांधणे हे पुण्यकृत समजले जाई. ती बांधण्यासाठी मजबूत दगडी खांब उभारून त्यावर कापूर; तसेच, अन्य ज्वालाग्राही द्रव पदार्थांच्या साहाय्याने दीप प्रज्वलित करून मंदिर परिसर प्रकाशमय करण्याचा हेतू राहत असे. म्हणूनच की काय? ढाणकीतील चर्मकार समाज दत्त मंदिर समोरील दीपमाळाची पूजा करून ते प्रकाश मय करतात.
तेच परंपरा ढाणकीतील चर्मकार समाजाने जिवंत ठेवली आहे . आज जवळ पास 90 वर्ष झाले असून त्यांची 10वी पिढी ही दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा चर्मकार समाजाची जुनी परंपरा निरंतर ठेवत दत्त जयंती निमित्त ढाणकी येथील टेंबेश्वर नगर येथील दत्त मंदिर जवळील दीप माळ जवळ सर्वात पहिले जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे पूजन करून भावी भक्तांनसाठी भोजनाचे आयोजन केले होते . दत्त जयंती निमित्त यात्रा भरत असताना हजारो च्या संख्येने भावी भक्त येत असतात. म्हणून त्यांनी यात्रेत यावेळेस जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या शिकवणी नुसार समाजात प्रकाश देण्याचे काम करत मंदिर परिसरातील दीपमाळ इलेक्ट्रिक दिव्यानी सजवून प्रकाशमय करून टाकले .
यावेळी चर्मकार समाज ढाणकी अध्यक्ष संजय परतूडे, उप अध्यक्ष बालाजी पाचकोरे, सचिव विष्णू सुरोशे, रमेश गायकवाड,शिवनंदा गायकवाड,अंजली परतूडे, महानंदा पाचकोरे, सीमा सुरोशे, पूजा सुरोशे, दत्ता कांबळे, गणेश सुरोशे आणि अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद चे ढाणकी शहर अध्यक्ष गजानन सुरोशे,देवराव डोंगरे आणि पूर्ण समाज उपस्थित होता.




