ताज्या घडामोडी

मुंबई टेनिस क्रिकेट  विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड.

मुंबई टेनिस क्रिकेट  विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड.

 

महाराष्ट्रा चीफ / एस.के.चांद

 

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक

सहविचार सभा नाशिक येथील .मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल

येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये ठाणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव महेश मिश्रा यांची मुंबई विभाग प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मुंबई जिल्ह्यातील सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम ,महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी,

, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, मीडिया प्रमुख गणेश भलेराव,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी इत्यादी उपस्थित होते. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेट बद्दल माहिती व नवीन नियम व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचं नियोजन सांगितले. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे काम बघता महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी टेनिस क्रिकेटचे काम ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करण्यात यावा म्हणून मुंबई टेनिस क्रिकेट विभाग प्रमुख म्हणून महेश मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती केल्याबद्दल

यांची विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट चे फाउंडर कन्हैया गुजर. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष मयुरी घाडीगावकर,भारतीय व महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी,

,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *