महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांना निरोप समारंभ.
ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग ढाणकी येथे मागील जवळपास दोन वर्षापासून कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांची नुकतीच ढाणकी येथून अकोला झोनमध्ये बदली झाल्यामुळे त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम नुकताच ढाणकी येथे पार पडला.
महावितरण विभाग पुसद येथील कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक अभियंता पवन गिरी, आत्राम, कनिष्ठ अभियंता महल्ले, तांत्रिक कामगार युनियनचे प्रादेशिक सचिव संजय पडोळे, वर्कर्स फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष गजानन राचटकर ,निवृत्त सहाय्यक अभियंता अनिल वानखेडे उपस्थित होते.ढाणकी उपविभागातील व सर्व वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांनी आपल्या वर्गमित्राबद्दल अनेक प्रासंगिक उदाहरणातून आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच उपस्थित सर्व वक्त्यांनी त्यांच्या ढाणकी येथील कार्याची विशेषता: वीज बिल वसुली बाबतचे वेळोवेळी उद्दिष्ट पूर्ततेच्या कार्याचे गौरव करून ते यापुढेही महावितरणच्या कार्यात सतत क्रियाशील राहतील अशा शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला सेवानिवृत्त वरिष्ठ यंत्रचालक एस.जी.मुनी ,प्रधान तंत्रज्ञ सुकळकर ,रफिक शेख ,आडे, कांबळे ,बालाजी बिट्टेवार, दवणे, मंजुसिंह, शेख रिजवान ,रवी सूर्यवंशी, काचर्डे ,हुसेन ,ज्ञानेश्वर महाजन ,कृष्णा कत्तुलवाड, मानकर, शेख रिजवान, सेवानिवृत्त चंद्रभान बाभळे यांचेसह ढाणकी, बिटरगाव, साखरा तसेच दराटी सेंटर येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन प्रधान यंत्रचालक श्री प्रभाकर दिघेवार यांनी केले.




