ताज्या घडामोडी

माहूर / माता रमाई सभागृहाचे लोकार्पण रखडले.तीन कोटी रुपये खर्च करून बांधली भव्यइमारत.

माहूर / माता रमाई सभागृहाचे लोकार्पण रखडले.तीन कोटी रुपये खर्च करून बांधली भव्यइमारत.

 

नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड

माहूर : शहरातील बुद्धभूमी परिसरातील भगवान गौतम बुद्ध पुतळा आणि डॉक्टरं बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरील जागेत माहूर नगरपंचायत तर्फे माता रमाई सभागृहाचे काम तीन कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास आले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी या सभागृहाचे लोकार्पण व्हावे, तशी स्थानिकांचे परभणळ इच्छा असून, प्रशासकीय पातळीवर मात्र तशा हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे स्थानिकाचे भ्रमनिरास होण्याचे चित्र आहे. माहूर नगरपंचायतीकडून गेल्या तीन वर्षातून तीन कोटी रुपये खर्चाच्या माता रमाई सभागृहाचे काम सुरू असून, अति भव्य आणि जबरदस्त इमारत सभागृह आणि इतर व्यवस्थेतेसह उभी आहे, या ठिकाणी पेव्हर ब्लॅक, झाडे, विद्युत व्यवस्था, यासह इतरही अनेक सुविधा या इमारतीत आहे. यामुळे परिसराची शोभा वाढली आहे. किरकोळ कामे वगळता इतर सर्व कामे पूर्णत्वास गेली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे कार्यक्रम घेता येणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी इमारतीचे लोकार्पण व्हावे. अशी इच्छा स्थानिक करत आहेत नगराध्यक्ष फिरोज दोसानी

हे या इमारतीसाठी आग्रही असल्याने, इमारतीला मंजुरी मिळाली.. मुख्याधिकारी विवेक कांदे, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, कार्यालयाधीक्षक वैजनाथ स्वामी, यांचे सह नगरसेवक, आणि कर्मचारी तसेच काही समाजबांधव इमारत लवकर पूर्ण व्हावी यासाठी झटत आहे…

About The Author