माहूर / वाई तांडा येथे परिषद प्राथमिक शाळा सांस्कृतीक महोत्सव दि. 27/01/2025 साजरा.
माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष नीलकंठवार.
जि.प.प्रा.शाळा वाई तांडा. ता.माहूर, जि. नांदेड येथे मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व चिमुकल्याने सहभाग नोंदविला. प्रस्तुत कार्यक्रमात विद्याथ्यांनी विविध नृत्याच्या माध्यमातून संस्कृतिची जोपासणा केली. आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गिते, तसेच हुंडाबळी प्रथेवर आधारीत समाजप्रबोधनपर नाटकाचे उत्कृष्ट सादरिकरण या कार्यक्रमात पाहायला मिळाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू राठोड व सर्व सदस्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ नाईक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कैलाश बेहेरे पाटील (तंटा मुक्ती अध्यक्ष) बाबुसिंग नाईक, उदय नाईक, डॉ मानकर साहेब, डॉ गणेश पवार साहेब, प्रकाश खडसे ,राजू शिंदे,उषाबाई गोविंद पवार, विलास राठोड सर,पंडित जाधव,बबलू जाधव व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.
आभार प्रदर्शनः बी.डी. ईश्वरकर सर जि.प.कें. प्रा.शाळा
वाई (बाजार) यांनी केले.
* सदरील शाळेतील मुख्याध्यापक श्री.यु.टी.पवार सर
* सहा. शिक्षिका श्रीमती राजकोंडवार मॅडम,
* सहा.श्री. नचिकेत कुरमेलकर सर तसेच, वाई तांडा येथील युवा शिक्षण प्रेमी शिवकुमार पवार यांच्या नियोजनाने सदरील कार्यक्रम संपन्न झाला.