महागांव /आंबोडा शिवारातील सहा एकरातील उसाला आग, लाखोंचे नुकसान.
महागाव प्रतिनिधी : लतीफ शेख
महागाव पोलिसांकडून स्पॉट पंचनामा
महागांव : तालुक्यातील
आंबोडा शेत शिवारातील शेत सर्व्हे नंबर ४७ मधील उसाला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादक शेतकरी मधुकर घनशाम कुबडे यांच्या उसाची आज तोडणी सुरू झाली परंतु दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री अंदाजे ११ वाजता उसाला आग लागून तब्बल सहा एकरातील ऊस पीक जाळून खाक झाले.
गुंज येथील साखर कारखाना प्रशासनाने आज कुबडे यांच्या उसाचा तोडणी चा प्रोग्राम लावला आहे. उसाला आग
लागल्याचे कारण शेतकऱ्याला कळले नाही. या संदर्भात गजानन मधुकर कुबडे यांनी महागाव ठाण्यात तक्रार दाखल
केली. जमादार मारोती मुनेश्वर, राईटर अमित नोळे यांनी आगीच्या घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर केला.