ढाणकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.
ढानकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे.
“राष्ट्रमाता फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शोषित वंचित असणाऱ्या बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य केले.राष्ट्रमाता फातिमा शेख यांचा क्रांतिकारी विचार आत्मसात करून आपल्या जीवनात अंमलबजावणी करून वर्तमान हक्क अधिकारांसाठी संघर्ष केला पाहिजे. माता फातिमा शेख यांनी माता सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या महान कार्यात तहयात साथ देत स्त्री शिक्षण क्रांतीसाठी मोलाची कामगिरी बजावून महान कार्य केले.” असे प्रतिपादन या कार्यक्रमाची अध्यक्षता करताना भारतीय युवा मोर्चाचे विद्वान केवटे यांनी केले.
ते ढानकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख,राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, यांच्या संयुक्त जयंती निम्मित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळी आयोजीत अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून ग्रामीण युवा पत्रकार संघाचे शहराध्यक्ष शेख इरफान भाई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रामराव गायकवाड,पत्रकार शेख इरफान,शिवसेनेचे एजाज पटेल,आयोजक शेख जब्बार यांनी फातीमा शेख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे संचालन भारतीय युवा मोर्चाचे अमोल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा चे महासचिव मुनव्वर भाई यांनी केले.
या कार्यक्रमाला अशोक गायकवाड, विकी मुदराज, मिलिंद चिकाटे,मतीन भाई,अक्षय भगत,दिलीप कलाले व अन्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ढाणकी शहरात माता फातीमा शेख यांची ही जयंती अठरापगड जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन ,प्रबोधन करून प्रथमच साजरी करण्यात आली.यामुळे या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.