यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
आज दिनांक २७/०८/२०२४ रोजी मौजा फुलसावंगी येथे पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या झाडाझुडपांचा सहारा घेत लपुन छपून अवैधपणे गावठी हातभट्टी लावून दारुची गाळप करुन विक्री करणाऱ्यांवर महागांव पोलीसांनी कार्यवाही करुन त्यांच्या हात भट्टया उध्वस्त केल्या. मौजे फुलसावंगी येथील १) नुर खॉन अस्लम खॉन पठाण वय ४५ वर्ष व २) जावेद खान युसूफ खाँन वय ३२ वर्ष हे मौजे फुलसावंगी येथुन वाहणाऱ्या पैनगंगा नदिच्या काठावर असलेल्या झाडाझुडपांचा आधार घेवून अवैधपणे गावठी हातभट्टी लावून गावठी दारुची गाळप करुन विक्री करत होते. त्यांचे बाबत माहिती घेवून महागांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री धनराज निळे साहेब यांचे मार्गदर्शनात फुलसावंगी बिटचे जमादार सुहास कायटे सोबत संतोष जाधव, आतिष जारंडे व चालक राजु तिजारे यांनी आज सकाळ पासुन सापळा रचुन पैनगंगा नदिच्या काठावर असलेल्या घनदाट झुडपांमध्ये जावून अवैध गावटी हातभट्टया उध्वस्त केल्या. सदर कार्यवाही मध्ये पोलीसांनी १) नूर खॉन अस्लम खॉन पठाण वय ४५ वर्ष, रा. फुलसावंगी याचे हातभट्टीवर मोहामाचाचे ५२ पिंपे ज्यामध्ये ७८० लिटर मोहामाच किंमत ३९०००/- रुपये, व ५० लिटर गावठी दारु किंमत ५०००/- रुपये असा एकुण ४४०००/- रुपयांचा मुद्येमालावर छापा टाकण्यात यश आले व २) जावेद खान युसूफ खॉन वय ३२ वर्ष, रा. फुलसावंगी याचे हातभट्टीवर मोहामाचाचे ६४ पिंपे ज्यामध्ये ९६० लिटर मोहामाच किंमत ४८०००/- रुपये व ३० लिटर गावठी हातभट्टीची दारु किंमत ३०००/- रुपये असा एकुण ५१०००/- रुपयांचा मुद्येमाल मोक्यावर नष्ट केला. सदर कार्यवाहीमध्ये पोलीसांनी अवैध दारुच्या हातभट्टया हया संपुर्णपणे उध्वस्त केल्या आहेत.