महाराष्ट्रा चीफ ब्युरो. एस.के.चांद.
काही दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील मेट येथे बैलगाडीत बसलेल्या पिता पुत्राच्या समोर अचानक वन्यजीव येऊन,त्यांच्या धडकेमुळे तलावात बुडून मृत पावलेल्या मेट येथील चव्हाण कुटुंबातील देविदास चव्हाण व अमोल चव्हाण यान पिता पुत्रंचा दुर्दैवी अंत झाला.आणि परिसरात एकच शोककळा पसरली.
या घटनेनंतर सर्वत्र हळ हळ व्यक्त केल्या जात आहे.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे ह्या सामान्य कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
तालुक्यातून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती
या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन करीत आहे.
त्यातच काल बहुजन मुक्ती पार्टी चे उमेदवार विद्वान भाऊ केवटे यांनी ह्या कुटुंबाची भेट घेऊन तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन कॉल करून ,”शासनाच्या माध्यमातून या कुटुंबास तात्काळ शासकीय मदत व्हाव,अन्यथा ह्या कुटुंबासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरुन प्रसंगी आंदोलन करू.” असा इशारा देखील दिला.
या भेटीत गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते.आणि त्यांनी या कार्यवाही मुळे आभार व्यक्त केले .यावेळी विविध सामाजिक संघटना चे कार्यकर्ते तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.