क्राईम डायरी ताज्या घडामोडी

महागांव / अवकाळी वादळी वाऱ्यात सवना वेणी शिवारात वीज पडून म्हैसी चा मृत्यू.

महागांव / अवकाळी वादळी वाऱ्यात सवना वेणी शिवारात वीज पडून म्हैसी चा मृत्यू.

 

 

 

जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव

 

 

 

महागाव तालुक्यातील दि.२१/५/२०२४रोजी सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान सवना वेणी परिसरात सय्यद चांद सय्यद उस्मान. यांच्या शेतातील गोठ्यात वीज पडून म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली महागाव तालुक्यातील करंजखेड जनूना अमनी कासारबेहळ वरोडी काळी टेंभी सवना वेणी गुंज अशा अनेक गावात दि. २१ रोजी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह सोबत विजांच्या कडकडाट वादळी वारा सुरू होता या वादळी वाऱ्यात एका म्हशीवर सवना शेतसीवारात वीज पडून जागीच ठार झाल्याची झाल्याची घटना घडली . जवळपास एक ते दोन तासभर झालेल्या या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

 

 

 

. तालुक्यातील शेतकरी पेरणी पूर्ण मशागतीत व्यस्त असताना लग्नसराइच्या आखरी टोकावर गेल्या पंधरा दिवसा पासून अवकाळी वादळी वाऱ्या पावसाचे आगमन होत असल्याने महागाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी वर्गाला फटका. या उघडझाप पावसाच्या हजेरीने गर्मीच्या तापमानात वाढ सुद्धा दिसून येत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसात 42 ते 43चा पारा पार पडत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *