उमरखेड येथे प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल माने,चातारीचे सदाशिव माने यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश.
उमरखेड प्रतिनिधी! संजय काळे
आज दिनांक 23 ऑगष्ट 2023 रोजी सिंहगड शिवसेना संपर्क कार्यालय उमरखेड येथे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे नेते आदरणीय प्राचार्य मोहनराव मोरे,अँड. उपजिल्हाप्रमुख बळीराम मुटकुळे, उपजिल्हा संघटक श्री.राजेश खामणेकर, तालुकाप्रमुख श्री.सतीश नाईक, शहरप्रमुख श्री.गजेंद्र ठाकरे, माजी शहरप्रमुख डॉक्टर अजय नरवाडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.अनिल किसनराव माने व चातारी ग्रामपंचायतचे सदस्य श्री. सदाशिव जांबुवंत माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत इतर असंख्य कार्यकर्ते काही दिवसात प्रवेश करणार आहेत याप्रसंगी विभाग प्रमुख चांदराव सुरोशे युवा सेनेचे उमरखेड शहर विभाग प्रमुख अनिल काळबांडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.