आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला लवकर न मिळत नसल्याने भाविक भाऊ भगत यांनी ढाणकी PHC येथे भेट दिली.
राहिलेला मानधन जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.
आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला त्यांच्या कामाप्रमाणे मिळत नाही आहे सर्व प्रकारचे सर्व लोकांची माहिती गोळा करणे कागदपत्रे जमा करणे नोंद ठेवणे विविध आरोग्य कॅम्प विषयी माहिती देणे घरोघरी जाऊन तपासणी करणे ही अशी कामे त्यांना देण्यात आली आहे परंतु त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मानधन मिळत नाहीये पाच पाच – सहा महिने त्यांचा पगार होत नाही एवढी कामे करून सुद्धा वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार एवढे कामे करून घेतल्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्या मानधनाकडे लक्ष नाहीये त्या अनुषंगाने याची तात्काळ दखल घेत टी एच ओ अधिकारी उमरखेड यांना निवेदन देऊन पंचमीच्या अगोदर आशा वर्कर यांचा राहिलेला मानधन जमा न केल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत यांनी दिला या वेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड तालुका उपाध्यक्ष सुरज भाऊ पवार रोशन भाऊ मुडे युवराज भाऊ राठोड उपस्थित होते.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे