उमरखेड / बंदी भागातील प्रमोद भाऊ राठोड या युवा नेतृत्वाचे सार्वत्रिक कौतुक.
उमरखेड तालुक्यातील अत्यंत बंदी भागातील वावरत असणारे प्रमोद राठोड यांचा एक नवा चेहरा नवरूपाला आला आहे. बंदी भागातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे तसेच गोरगरीब जनतेच्या शासकीय दरबाराच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी भाविक भाऊ भगत यांच्या नेतृत्वामध्ये प्रमोद भाऊ राठोड कार्य करत आहेत. भाविक भाऊ भगत यांच्या तालमीत हा पहिलवान तयार होतोय नक्कीच भाविक भाऊ भगत यांच्या सारखा जर पाठीराखा मार्गदर्शक सोबत असेल तर नक्कीच प्रमोद राठोड यांना बंदी भागातून संधी मिळू शकते. प्रमोद भाऊ राठोड यांची नुकतीच भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. प्रमोद राठोड यांनी संपूर्ण बंदी भाग पिंजून काढला आहे त्यांच्या नावाची चर्चा सध्या बंदीभागात खूप होत आहे..
उमरखेड तालुका प्रतिनिधी. संजय काळे