महागांव / शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मुडाणा येथे शिबिराचे आयोजन
महागाव/ तालुक्यातील मुडाणा येथे महसूल प्रशासनातर्फे शासनाची महत्वाकांक्षी योजन शासन आपल्या दारी योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी
वि.जिल्हाधिकारी महोदय यांनी आज मुडाणा येथील शासन आपले दारी कैम्पला भेट दिली व मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी महागाव श्री.एकनाथजी काळबांडे साहेब व तहसीलदार महागाव श्री.विश्वम्भर राणे साहेब, गटविकास अधिकारी टाकरस, मंडळ अधिकारी राम पंडित, सरपंच वैभव बरडे, सेतु व्यवस्थापक अमोल क्षीरसागर व नारायण शिरबीडे,
तलाठी ललित इंगोले, निजधाम आश्रम संस्थेचे अध्यक्ष परसराम भगाजी वानखेडे, ग्रामसचिव पतंगे साहेब, अंबादास पाटील आकाश पानपटे, अशोक वानखेडे, संदीप खराटे, रवी डहाळे, आशा वर्कर गावातील कर्मचारी व शिक्षक वृंद,
नागरिक तसेच तालुक्यातील अधिकारी कर्मचारी हे हजर होते. यावेळी जिल्हाधिकारी महोदय यांनी अधिवास, उत्पन्न, जातीचे दाखले, प्रतिज्ञालेख, रेशनकार्ड मधील नाव कमी जास्त करणे, मनरेगा मधून विहीर पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राचे वितरण वि.जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते करण्यात आले.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख