पोफाळी येथील के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज्यातुन प्रथम.
पोफळी वसंत नगर प्रतिनिधी/ सुवास खंदारे
येथील स्व. वसंतराव नाईक अंध मूक-बधिर व अपंग शिक्षण संस्था द्वारा संचालीत के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी करण रामकिसन पवार हा दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय पुणे क्रिडा स्पर्धे मध्ये १३ ते १६ या वयोगटातून गोळाफेक या खेळामध्ये राज्यातून प्रथम आला.व अंध विद्यार्थीनी दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा पुणे येथे कु. मनिषा पिटलेवाड ही १०० मिटर धावणे या क्रिडाप्रकारात तृतीय आली तर कु. आरूषी शिवाजी कबले ही विद्यार्थीनी उभे राहूण लांब उडी या क्रिडाप्रकारात तृतीय आली. स्पर्धेचे आयोजन दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व समर्थ व्यायाम मंडळ इंदापुर पुणे यांचे संयुक्त विद्यमाने केले होते.
या विजयी मूक बधिर व अंध दिव्यांग विद्याथ्र्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. डी. जाधव, अध्यक्ष डॉ. संजयभाऊ जाधव, सचिव विजय भाऊ जाधव, सदस्य देव जाधव व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, वैद्यकिय सामाजिक कार्यकता सचिन महल्ले तसेच मुख्याध्यापक एन. बी. राठोड, पी. जे. जामकर यांनी केले तर
दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रिडास्पर्धा पुणे येथे विद्याथ्र्यांना विजय धोंगडे, वैभव बाकडे, प्रशांत बनसोड, प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन करून सहकार्य केले.