अर्धापूर शहरात दृष्टी इंटरप्रायजेस कंट्रक्शन कंपनी अर्धापूरमध्ये बोगस काम करत असून दि :- २१.११.२०२२ पासुन अमरण उपोषणास साठी बसणार ,खतीब अब्दुल सोहेल
नांदेड/एस के चांद यांची बातमी
अर्धापूर नगरपंचायत मार्फत दृष्टी इंटरप्रायजेस कंन्ट्रक्शन कंपनीला दिलेले टेंडर तात्काळ रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सदर कंट्रक्शन कंपनीचे आजपर्यंत अर्धापूर शहरामध्ये केलेली सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेली आहे. अर्धापूर शहरामध्ये अनेक वार्डामध्ये नालाचे काम, नालीवरील ब्रिजचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. वार्ड क्र.११ व १२ मधील नालीवरील ब्रिज ( ढाकन) १५ दिवसाच्याआत तुटला गजाळीचा वापर करण्यात आलेला नाही. अर्धापूर शहरातील मोठया नालेचे काम अत्यंक निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदर कामात संबंधीत विभागाने दिलेल्या आदेशानुसार काम करणारे गुत्तेदार / कंत्राटदार अटी व शर्तीप्रमाणे काम केले नाही. सदर काम अत्यंत बोगस झाले असुन शासनाच्या पैश्चा अपहार केलेला आहे जिल्हा सह आयुक्त (नपाप्र) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी मुख्याधिकारी, अर्धापूर यांना दिलेले पत्रामध्ये असे नमुद केले आहे की, प्रस्तुत प्रकरणात संदर्भीय तक्रारीची प्रत या समवेत देवून कळविण्यात येते की तक्रारीमध्ये नमुद मुदयाच्या अनुषंगाने प्रकरणासंबंधी सविस्तर मुदयेनिहाय स्वंयस्पष्ट अभिप्रयासह अहवाल या कार्यालयास आंदिर कुरावा. परंतु संबंधी पत्रावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्या अनुषंगाने खतीब अब्दुल सोहेल अर्धापूर न पं कार्यालया समोर दि 21/11/2022 पासून आमरण उपोषणस बसणार