हिमायतनगर येथील कृषी दुकानदाराकडून चना बॅगची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु
मुख्य संपादक/एस.के.चांद यांची बातमी
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना जाकी 92/18 ह्या 30 किलोच्या चना बॅगला शासनाकडून परमिट देऊन सुद्धा शहरातील काही दुकानदार ते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध. करून देत नाही व त्यांच्याकडून जादा दराने पैसे वसूल करून त्याच बॅगची चढ्या भावात विक्री करत असल्याची तक्रार वडगाव ज येथील शेतकऱ्यांनी केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील कृषी कार्यालया कडून शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर चना बॅकचे परमिट देऊन त्यांना मंडळाच्या दरात सबसिडी देऊन येथील कृषी दुकान मधून ते उपलब्ध करून घ्या असे सांगण्यात आले तरी पण शहरातील काही दुकानदार ज्याकी 92/18 या 30 किलोची चनाबॅग उपलब्ध नाही असे सांगून दुसऱ्या शेतकऱ्याना चढ्या भावात त्याची विक्री करून आपल्या खाजगी गोदाम मधून ते देत आहेत व ह्या बॅग ची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून बाजारात त्याची कृत्रिम टंचाई असल्याची परिस्थिती हे दुकानदार निर्माण करत आहेत ह्याची उच्चस्तरीय चौकशी करून हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना एन चना पेरणीच्या तोंडावर जॅकी 92/18 या 30 किलोच्या चना बॅग वर 2000 च्या वर पैसे मोजून ही बॅग बाजारपेठेत विकत घावी लागत आहे या बाबीवर स्थानिक कृषी अधिकारी जाधव साहेब यांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित दुकानावर कारवाई करावी अशी मागणी वडगाव ज येथील असंख्य शेतकऱ्यांनी केली आहे