उमरखेड/ येथे आज न्यू जय-माँतादी दुर्गा उत्सव मंडळ तर्फे रक्तदान शिबिर संपन्न,
उमरखेड / सुभाष वाघाडे यांची बातमी
दिनांक 05ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमीच्या निमित्ताने न्यू जय माता दी दुर्गोत्सव मंडळ सिद्धेश्वर नगर, बोरबन उमरखेड. व मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्था उमरखेड च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा.श्री. आनंद देऊळगावकर साहेब तहसीलदार उमरखेड. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री अमोल माळवे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन उमरखेड, मा.श्री.दत्ता गंगासागर साहेब संस्थापक अध्यक्ष गंगासागर इंग्लिश मीडियम स्कूल तथा सामाजिक कार्यकर्ता,तसेच माजी शिक्षण सभापती न.प.उमरखेड मा.श्री.गजेंद्र ठाकरे,विजूभाऊ हरडपकर,संजय साळुंके, डॉ.स्वप्नील वानखेडे, पटवारी सानप साहेब,गजानन सुरोशे,कांबळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळाचे विशेष म्हणजे दरवर्षीच रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येते व विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून नवरात्र साजरी केल्या जाते.तसेच मा.श्री देऊळगावकर साहेब यांचा वाढदिवस सुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आला. मा.श्री माळवे साहेब यांनी दुर्गोत्सव मंडळ राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली.व मंडळास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन गजानन पाचकोरे सर यांनी केले तर आभार राहुल कोळपे यांनी मानले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मैत्री परिवार चे अभि ठाकूर, सावन हिंगमिरे, मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव,प्रशांत खांडरे,नाना खापरे,रत्नदीप सांगडे,कपील कांबळे,गोपाल सोनुने,सतीश हंबीर,अवधूत खडककर,विशाल जाधव,अक्षय घोडे,आशुतोष बोडगे,प्रीतम खंदारे, संजू श्रीवास्तव, केशवराव जाधव,जेष्ठ सदस्य देशमुख सर,भीमराव जाधव, दलाधन सूर्य,संतोष कांबळे, आदींनी परिश्रम घेतले.