क्राईम डायरी

कर्जास कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

कर्जास कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

 

हिमायतनगर /एस के चांद यांची बातमी

 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेत सर्वे नंबर २१४/२ मध्ये धम्मपाल सखाराम थोरात वय ३२ या तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जास कंटाळून आपल्याच शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना आज दि . ६ जून रोजी घडली आहे . पेरणीचे हंगाम तोंडावर आल्याने पेरणीसाठी पैसे नसल्याच्या विवंचनेतून ३२ वर्षीय धम्मपाल सखाराम थोरात या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेत सर्वे नंबर २१४/३ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे , या घटनेचा तपास हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक सिंगनवाड करत आहेत .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *