अर्धापुर वार्ड क्रं.१३ मधील सी.सी.नालीचे बांधकाम करण्यात यावे.कॉंग्रेसचे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शेख मकसुद
अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल
मुख्याधिकारी सैलेश फडसे,व नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगर पंचायत अर्धापूर यांना सामाजिक कार्यकर्ते व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष शेख मकसुद व सामाजिक कार्यकर्त्या शबाना बेगम यांनी,खुबाकॉलनी वार्ड क्र.१३ मध्ये सी.सी.नालीचे पाऊसाळ्यादुगर बांधकाम करून देण्याचे निवेदन दिले.
अर्धापूर शहरातील खुबाकॉलनी वार्ड क्र.१३ मधील शेख मकसुद यांच्या बाजूचे लहानकर यांच्या घरापासून ते अब्दुल कबीर यांच्या घरापर्यंत नगर पंचायत अर्धापुर यांच्या मार्फत आजपर्यंत सी.सी.नालीचे बांधकाम करण्यात आले नाही या गल्लीतील लोकांना आरोग्याचा सामना करावा लागत आहे.
शहरातील वार्ड क्र.१३ मधील खुबाकॉलनी भागातील लहानकर यांच्या घरापासुन ते अब्दुल कबीर यांच्या घरापर्यंत संपुर्ण घरे बांधलेली असुन अंदाजे ४०० फुट सी.सी.नाली आज पर्यंत बांधण्यात आलेली नाही त्यामुळे तेथील रहिवाशी लोकांचे रोज वापरण्यात येणारे सांड पाणी व ईतरपाणी नालीमध्ये सोडण्याची व्यवस्था नसल्यामुळे ताप,डेंग्यू,मलेरीया,सर्दी खोकला,टायफट,व ईतर अनेक प्रकारचे रोग पसरण्याची व रोग होण्याची शक्यता टालता येत नाही.
शहरातील वार्ड क्रं.१३ खुबाकॉलनी भागातील लहानकर यांच्या घरापासुन ते अब्दुल कबीर यांच्या घरापर्यंत सी सी नालीचे बांधकात तात्काळ करण्यात यावे सांडपाण्यामुळे या वार्डातील लोकांना त्रास होणार नाही कारण पाऊस सुरू झाला आहे.