ताज्या घडामोडी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून 22 एप्रिल पासून बंद ची

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून 22 एप्रिल पासून बंद ची

 

जिल्हा प्रतिनिधी/ एसके शब्बीर यांचे रिपोर्ट

 

नोटीस नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि . , युनिट नं . २ गुंज सवना , ता . महागाव , जि . यवतमाळ गळीत हंगाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बंदची नोटीस | नॅचरल शुगर कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेल्या व बिगर नोंद केलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुचित करण्यात येते की , कारखान्याचा चालू गळीत हंगाम २०२१-२२ साठी नोंदलेल्या सर्व ऊसाचे गाळप जवळपास पूर्ण होत आलेले असल्यामुळे कारखान्याचा चालु गळीत हंगाम दिनांक २२ एप्रिल २०२२ च्या दरम्यान बंद होणार आहे . तरी ज्या शेतकऱ्यांचा चालु गळीत हंगाम २०२१-२०२२ चे हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेला करार केलेला व बिगर नोंदीचा गाळप पात्र ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिलेला असेल , अशा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या गाळपाच्या कार्यवाहीसाठी त्वरित कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधून आपल्या ऊसाची आपण स्वतः तोडणी व वाहतूक करून दिनांक २२/०४/२०२२ पर्यंत कारखाना बंद होण्यापूर्वी कारखान्याकडे गळीतास पाठवून द्यावा . अन्यथा कोणत्याही कारणास्तव गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाची कोणतीही जबाबदारी कारखान्यांवर राहणार नाही . याची कृपया महागाव तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सवना गुंज नॅचरल शुगर कारखान्याकडून शेतकऱ्यांना आवाहन केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *