ताज्या घडामोडी

बोरगडी तांडा येथे उभ्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किट मुळे भयंकर आग लागून पूर्णपणे ऊस जळून खाक झाला आहे.

बोरगडी तांडा येथे उभ्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किट मुळे भयंकर आग लागून पूर्णपणे ऊस जळून खाक झाला आहे.

हा प्रकार महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे घडला असल्याचा शेतकऱ्यांचे आरोप…

नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे

 

हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे गरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाच्या मळ्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे उसाचा मळा जळून खाक झाला आहे.

राम खिरू जाधव व आत्माराम धनु राठोड .अशा या दोन्ही शेतकऱ्यांचा दोन दोन एकर ऊस लावला होता.आज त्यांच्या महावितरणच्या

नाकर्तेपणामुळे त्यांचा आज लाखो रुपयांचा ऊस पूर्णपणे जळून खाक झालेला दिसून येत आहे

.या आधीच शेतकरी पूर्णपणे अतिवृष्टीने दुष्काळग्रस्त असून यात आणखी महावितरण कंपनी च्या नाकर्तेपणामुळे संकटांचा त्यांच्यावर मोठा भर पडला आहे.

या घटनेने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

पावसाळ्यामध्ये त्यांच्या सोयाबीन कापूस पूर्णपणे पाण्याखाली गेला असून त्यांचा फक्त ऊसच शेतात. राहिला होता, तो देखील आज आग लागुन पूर्ण पणे मोठ्याप्रमाणात जळून खाक झाला आहे. परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा महावितरण कंपनी व मंडळ अधिकारी तलाठी अध्याप पंचनामा करण्यासाठी पोहोचलेले नाही.तरी त्यांना कारखानदारांनी तोड चिटी लवकर देऊन त्यांना या ऊसाला लवकरात लवकर तोडणिस

सुरुवात करावी असे या शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.व महावितरणच्या नाकर्तेपणामुळे ढिसाळ कारभारामुळे आज रोजी आमचा ऊसाचा फड जळून खाक झालेला आहे. असे शेतकऱ्यांनी माहिती दिली व त्वरित प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे येथील शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी केली .आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *