क्राईम डायरी

मराठवाड्यातून होत असलेली वाळूची तस्करी विदर्भातील पोलीसांनी केली उघड वाळू तस्कराला केले जेरबंद.

मराठवाड्यातून होत असलेली वाळूची तस्करी विदर्भातील पोलीसांनी केली उघड वाळू तस्कराला केले जेरबंद.

ब्योरो रिपोट :- एस.के.चांद तैयब

उमरखेड तालुक्यातील .बिटरगाव पोलीस ठाण्याचे अंतर्गत पैनगंगा नदी पात्रातुन वाळू उपसा होत असल्याने बिटरगाव ठाणे अंमलदाराने शिंदगी येथुन मुद्दे मालासगट डोलारि येथिल शिवाजी माने यांना पकडुन यांच्या वर बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पैनगंगा गंगा नदी वाहते नदीच्या अलीकडील मराठवाडा येथील रेती तस्कर विनापरवाना रेतीची उघड तस्करी करून विक्री करत होते रेती तस्कराला पकडण्यासाठी खबरिया मार्फत बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना माहिती मिळाली की विदर्भातील शिंदगी गावातील नदीपात्रातून नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुक्यातील डोलारी येथील शिवाजी माने हा आपल्या मजरासह ट्रॅक्टर घेऊन वाळू भरण्यासाठी येत असल्याची माहिती पीएसआय रामकिसन जायभाई ढाणकी बीड जमादार मोहन चाटे पोलीस निलेश भालेराव यांनी येथील नदीपात्रात दबा धरून बसल्याने नदीपात्रात ट्रॅक्टर येण्याची वाट पाहत बसले.
नदीपात्रात वाळू भरत असताना दिसताच डोलारी येथील शिवाजी माने यांना ट्रॅक्टर सहित रेती तस्करला वाळू भरताना चालक व शिवाजी माने यांना पकडले.व अटक करुन ३७९,२६९,१८८अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणे अंमलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चव्हाण पीएसआय रामकिसन जायभाये ढाणकी बिट जमादार मोहन चाटे पोलिस निलेश भालेराव तपास करीत आहेत. रेती तस्कराला अटक करताच हिमायतनगर तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले
रेती तस्कराला सोडण्यासाठी राजकीय क्षेत्रातील अनेकांनी फोन करुन सुद्धा रेती तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे रेती तस्कराला सोडवण्यासाठी पर्यत्न बंद केल्यास वाळू तस्करी बंद होईल असे नागरिकांतून बोलले
मराठवाड्यातील रेती तस्करावर विदर्भात जेरबंद करण्यात आले परंतु हिमायतनगर तालुक्यातील प्रशासन हप्ते घेऊन कोणतीही कारवाई करण्यात पुढे येत नाही त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे प्रशासनाला माहिती असुन सुद्धा कार्यवाही करण्यात येत नाही हिमायतनगर तालुक्यातील रेती तस्करावर केव्हा कारवाई होईल असे नागरिकांतून बोलले जात आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *