प्रतिनिधी/ 15 मे
ढाणकी : नगर पंचायतीकडे निधी नसल्याने नगर सेवक गावात कुठलंही काम करू शकत नसल्याने वैतागलेल्या संतोष पुरी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह जिल्हाधिकारी महोदय आणि प्रशासनाकडे मदत मागितली, मात्र तरीही नपला निधी न दिल्या गेल्याने भाजपाचे गतनेते संतोष पुरी यांनी उपोषणाचे अस्त्र उगरले होते, मात्र कलम 144 लागू असल्याने आणि प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे, मात्र निर्धारित वेळेत नप ला निधी मिळाला नाही तर पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारून ढाणकीकरांचा हक्क मिळवून घेवू अशी भूमिका संतोष पुरी यांनी घेतली आहे.
“बाप खाऊ घालेना, अन माय भीक मागू देईना !” अशी ढाणकी नगर पंचायतीची अवस्था झाली आहे. ढाणकी नगर पंचायतीला नगर विकास विभागाचा नवा छदामही आलेला नाही आणि ग्राम पंचायतीला मिळालेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास मुभा नाही, अश्या बिकट प्रसंगी काम कसे करणार? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाचे गतनेते तथा नगरसेवक संतोष पुरी यांनी मुख्यमंत्री, उद्धवजी ठाकरे, जिल्हाधिकारी महोदय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली होती, मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.
आज संपूर्ण जग कोरोना नावाच्या वैश्विक संकटाचा सामना करीत असताना 30 हजार लोकसंख्येच्या ढाणकी शहराला वाऱ्यावर सोडण्यात आले. कोरोना महामारीच्या उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी 5 लाखांपर्यंतच्या कामाची प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना दिले, मात्र निधी उपलब्धतेसाठी वारंवार मागणी करूनही शासन ढुंकून पाहत नसल्याने भाजपाचे गतनेते संतोष पुरी यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते, एकतर नगर पंचायतीला तात्काळ निधी उपलब्ध करून द्या नाहीतर ग्राम पंचायतीचा शिल्लक असलेला 14 व्या वित्त आयोगाचा 1 कोटी 93 लाखाच्या निधीला खर्च करण्यास परवानगी द्या अशी मागणी रेटून धरली, त्यानंतर या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली, नगर विकास अधिकारी श्री नंदा यांनी मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात चर्चा केली, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भुतडा, आ. नामदेवराव ससाणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्यामभैया जयस्वाल यांनी ढाणकी नगर पंचायतला तात्काळ निधी उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाचा पाठपुरावा केला. त्यानंतर नप चे मुख्याधिकारी यांनी संतोष पुरी यांना निधी लवकर उपलब्ध होणार असल्याचे लेखी आश्वासन दिले, याचबरोबर कोरोना संदर्भातील उपाय योजनांची अंमल बजावणी तातडीने करून घेवू असे आश्वस्त केले, ज्यामुळे संतोष पुरी यांनी उपोषणाचे अस्त्र म्यान केले, मात्र निर्धारित वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारु असे संतोष पुरी यांनी प्रशासनाला स्पष्ट खडसावले आहे.