हिमायतनगर(तालुका प्रतिनिधी)
कोरोना आपत्ती निमित्य शहरातील कर्मचारी व कॉरंनटाईन केलेल्या नागरिकांना जेवनाच्या डब्याची व्यवस्था
संघाच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात जपली माणुसकी
उफ परमेश्वर मंदिर येथे आज दि 5 मे पासुन दररोज शहरातील 200 नागरिकांना विश्वहिंदु परिषद बजरंग दल तर्फे कोरोनाच्या आपत्ति निमित्य संकट काळात शहरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना व बाहेर गावा वरुण आलेल्या नागरिकांना कॉरंनटाईन कुटूंबियांना शहरातील संघाच्या कार्यकर्त्यांन कडुन दररोज 12 ते 3 वाजे पर्यंत नित्य अन्नछत्र देण्यात येत आहे
कोरोनाच्या संचारबंदीत अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबापासुन दूर राहून हिमायतनगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावत आहेत त्यात त्यांच्या जेवनाची सोय होत नाही त्यामुळे शहरातील संघाच्या कार्यकर्त्यांनी संकट काळात आपली माणुसकी जपत शहरातील कॉरंनटाईन केलेल्या नागरिकांना व गरजू व्यक्तींना नित्य नेम दररोज दुपारी 12 ते 3 वाजे पर्यंत मोफत अन्नछत्र देण्याची सुरवात करण्यात आलि आहे असे बजरंग दल तालुका सयोजक गजानन चायल यांनी सांगितले
यावेळी उपस्थित नगराध्यक्ष कुणाल राठोड,परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, देवगिरी प्रात मंत्री शामजी रायेवार सर,विश्वहिंदु परिषद जिल्हा मंत्री किरण भाऊ बिच्चेवार, बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल,गजानन भाऊ तुप्तेवार ,विठ्ल ठाकरे,विलास वानखेडे,नरवाडे,सावन डाके,बंडूभाऊ अंनगुलवार,अजय बेदरकर,नागेश शिंदे ,शुभम दंडेवाड ,दीपक कात्रे सह असंख्य जन यावेळी उपस्थित राहून गरजू नागरिकांना जेवण वाटप केले
हिमायतनगर शहरात कोरोना महामारी च्या विरोधात दिवस रात्र अत्या आवश्यक सेवा देणाऱ्या कोरोना वॉरियर्स कर्मचाऱ्यांना पोट भर जेवनाचे डब्बे देण्याची व्यवस्था सुद्धा विश्वहिंदू परिषद व बजरंग दल तर्फे करण्यात येत आहे असे बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल यांनी सांगितले