क्राईम डायरी

महसुल विभागाची धडक कारवाई मराठवाड्यातील वाळु माफीयाच्या मुसक्या विदर्भात आवळल्या .

 

नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी

-3मे रोजी रात्री विदर्भ मराठवाड्यातुन वाहनार्यी पैन गंगा नदी पात्रातुन रेतीची चोरी होत असल्याची माहिती उमरखेड जिल्हा यवतमाळ चे स्वप्नील कापडनीस ऊप विभागीय अधिकारी यांनी आपल्या फौज फाटा घेऊन सारी रात्र नदी पात्रात काडुण अवैध उत्खनन करताना रेती तस्काराना पकडण्यासाठी उमरखेड,रुपेश खंडारे तहसीलदार ऊमरखेड यांचें मार्गदर्शनाखाली वाळु तस्करावर दंडात्मक कारवाई.
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पैन गंगा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळू काढणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल आणि पोलिस विभागाच्या पथकाने रविवारी तीन मे रोजी मध्यरात्री संयुक्तरित्या कारवाई केली असता वाळू माफिया चे धाबे दणाणले आहे परंतु सोमवारी सकाळी संबंधित ट्रॅक्टर कारवाई करण्यात आली बिटरगाव शिवारातील पेन गंगा नदीपात्रातून वाळू चोरट्या मार्गाने होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली.
.महसुल विभागाच्या रात्रपाळीच्या असलेल्या पथकातील माहितीनुसार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी राम पंडित पोलीस शिपाई निलेश , होमगार्ड यजमलवार यांचे पथकातील अधिकाऱ्यासह खबर देणाऱ्या दोन व्यक्तीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री तीन मे रोजी नदीपात्रात दबा धरून बसलेल्या काही वेळानंतर रात्री दोन वाजता मराठवाड्याकडुन जवळपास पंधरा ते वीस मंजुर घेऊन नदीत वाळु भरत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी वाळू भरताना ट्रॅक्टर जप्त केले नंतर मजुरांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला ट्रॅक्टर सहित 4 मे रोजी सकाळी अकरा वाजता दंडात्मक कारवाई करण्यात महसुल कार्यालय ऊमरखेड येथे वाळुचे ट्रॅक्टर जमा करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *