आ.डाँ.वजाहत मिर्झा यांचे कडून उपजिल्हा रूग्नालयाला पीपीई किट चे वाटप
प्रतिनिधी:—यवतमाळ,पुसद इरफान शेख,
उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आमदार डॉ वजाहत मिर्झा साहेब व युवानेते लोकनियुक्त आमदार इंद्रनीलभाऊ मनोहरराव नाईक यांच्या हस्ते कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी तसेच रूग्नाना योग्य उपचार करण्यासाठी समरक्षण पी पी ई सेफ्टी किट चे वाटप करण्यात आले.
रविवार दिनांक २६ एप्रिल २०२० रोजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या कडून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,आरोग्य सेवक,कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी 20 कोरोना सेफ्टी किट पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष आमदार इंद्रनीलभाऊ मनोहरराव नाईक व विधानपरिषद सदस्य तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळेस दोन्ही आमदारांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी व रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांना आणखी काय सुविधा उपलब्ध करता येईल याबाबतही माहिती घेतली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हरिभाऊ फुफाटे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, डॉ अमोल मालपाणी,उपजिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य अरविंद चव्हाण, इंद्रनील नाईक मित्र मंडळाचे सदस्य अभिजित पवार,अयुक खतीब,खासदार राठोड, रोहन राठोड, प्रथमेश मुदगुले, आदी उपस्थित होते.