बायोमेट्रिक खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा -शेख इस्माईल
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या बायोमेट्रिक मशीन खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत असल्याने सदरील बायोमेट्रिक खरेदीची चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेचे संस्थापक शेख इस्माईल शेख लतीफ यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. सविस्तर असे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीने 13 वा वित्त आयोग व 14 वा वित्त आयोग यातून प्रत्येकी 13 हजार रुपये या प्रमाणे बायोमेट्रिक मशीनची खरेदी केली परंतु आज घडीला या मशीन्स अनेक ग्रामपंचायती मध्ये दिसून येत नाहीत हिमायतनगर तालुक्यात एकूण 52 ग्रामपंचायती असून अनेक ग्रामपंचायती मधुन मध्ये या मशीन सध्या दिसून येत नसल्याने सदरील बायोमेट्रिक मशीन खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शंका उपस्थित केली जात आहे ग्रामपंचायत निहाय तपासणी करून बायोमेट्रिक मशीन खरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शेख इस्माईल शेख लतीफ यांनी केली आहे. अन्यथा येत्या 24 जानेवारी रोजी पंचायत समिती हिमायतनगर येथे अमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही शेख इस्माईल यांनी दिला होता परंतु प.स. कार्यालय कडून मला पत्र क्रमांक 57/2019-20-.दि09/01/2020
लेखी पत्राद्वारे कळविले होते की आपण उपोषणास बसू नये आपणास चौकशी अहवाल लवकरच अवगत करण्यात येईल असे पत्र मला दिले होते त्यामुळे मी दि.24/01/2020रोजी चे उपोषण मी तात्पुरते स्थगित केले होते चौकशी अहवाल न मिळाल्याने मी येत्या 13/02/2020रोजी पंचायत समितीच्या कार्यालय समोर अमरण उपोषणास बसणार आहे
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीत 13 व 14 वा वित्त आयोग यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत असताना हिमायतनगर पंचायत समितीचे अधिकारी भ्रष्ट ग्रामसेवक व सरपंचांना पाठीशी घालत असल्याने नांदेड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी केल्यास कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यताही शेख इस्माईल यांनी वर्तवली आहे त्यामुळे हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बायोमेट्रिक मशीन खरेदीचा हा घोटाळा कीती गांभीर्याने घेणार याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी :- शेख चांद हिमायतनगर