उमरखेड महागाव मतदार संघाचे आमदारला शोधायचे कुठे? जनतेला पडला प्रश्न?

ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.
विधानसभा निवडणूक होऊन पाच महिने होत असून उमरखेड महागाव मतदार संघाचे आमदार किसन वानखेडे यांनी आपले जनसंपर्क कार्यलय कुठेच थाटले नाही.यामुळे जनता आपल्या समस्या आमदार साहेबाना सांगण्यासाठी कुठे जावे हे अवगत नाही.जनतेत म्हणणे आहे की आमदार साहेबाचा फक्त आमदार होण्याचा स्वप्न होता का?त्यांना आपल्या मतदार संघातील जनतेच्या समस्याचे काही घेणे देणे नाही का?आज उमरखेड तालुक्यात भीषण पाणी टंचाई असून तालुक्यातील जनता पाण्यासाठी तडफडत आहे आणि आमदार साहेब आमदारकी मिळाली यातच खुश आहेत त्यांना जनतेचे काही घेणेदेणे नाही.
आमदार साहेबाना हे माहिती नाही का?जनतेने त्यांना विधानसभेचा सदस्य करून त्यांना आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी करून राज्य सरकारमध्ये कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेणारा बनवले . तरी आमदार साहेबाना मतदारसंघातील लोकांच्या समस्या आणि अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवत नाही?मतदार संघातील जनता आमदार साहेबावर रोष करतात की,ते जनतेच्या समस्याचे कोणतेही पत्र असो किंवा कोणतेही निवेदन असो ते कोणाच्याच हवाली करीत नसतात.त्यांच्या नियोजनाची जबाबदारी मुलगा व अका यांच्यावरच आहे. कोण्या व्यक्तीला जर आमदार साहेबांचे पत्र पाहिजे असेल तर त्यांना आमदार साहेबाचं शोध घेण्यासाठी पुर्ण मतदार संघ पालथी घालावे लागते.घरी लोक येऊ नये म्हणून साहेब लवकरात लवकर घरून निघून जातात. त्यामुळे जनतेच्या समस्या दूर करणे सोडा जनताच परेशान होऊन आमदार साहेबांच्या घरी चकरा मारण सोडून देत आहे.
प्रशासनाकडून कमी कालावधीत यशस्वी कामे करून घेण्यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी यंत्रंणा उभी करण्याची जबाबदारी आमदार साहेबाची असताना सुद्धा त्यांनी महागाव उमरखेड मतदार संघात एक ही आमदार जनसंपर्क कार्यालय उभे केले नाही.पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा बाबतचे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या.असताना सुद्धा आमदार साहेब पाणी टंचाई असलेल्या ढाणकी गावाला टँकर तर सोडा पाणी उपाययोजना साठी भेट पण देत नाही. यामुळे
मतदार संघातील लोकांची आमदार साहेबाकडून कामे होत नसल्यामुळे आमदार साहेबावर सर्वच जनता नाराज होत आहे.




