ताज्या घडामोडी

उमरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे केंद्रस्तरीय सामन्याचे थाटात उद्घघाटन.

उमरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे केंद्रस्तरीय सामन्याचे थाटात उद्घघाटन.

 

उमरखेड सुहास खंदारे यांची रिपोर्ट.

 

आज दिनांक 18/12/2024 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे मोठ्या उत्साहात केंद्र स्तरीय क्रीडा सामन्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.रेखाताई संतोष क्षीरसागर (सरपंच) पोफाळी ह्या होत्या. मन समुद्रा सारखे विशाल ठेवा, नद्या स्वत:हून तुम्हाला भेटायला येतील. खेळामधुन साहस रुजवा, माणसं मशाल घेऊन तुमच्या साठी पेटायला येतील. असा मार्मिक संदेश त्यांनी बाल खेळाडूंना दिला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पंकज दाभाडे साहेब( P. S. I) वैश्विक विकास संस्थेचे प्रतिनिधी आनंद सुरवसे सर तसेच संजय भाऊ धोत्रे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोफाळी ( तांडा) ,अभय बरडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोफाळी,सुहास खंदारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत नगर ,सतिष राठोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जनूना,तरोडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब, आदरणीय शिवाजी राठोड सर, आदरणीय उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुळावकर सर,दरने सर जामगे सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्तृत्त्व, नेतृत्व, ज्येष्ठत्व आदी गुणांचा साठा असणारे आदरणीय शिवाजी राठोड सर यांनी केले. कार्यक्रमाचे बक्षीस शिल्ड व मेडल वैश्विक विकास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजयजी झरकर साहेब यांच्या दातृत्व या भावनेतून आमच्या बाल खेळाडूंना देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोरे सर गंगनमाळ यांनी केले तर आभार कैलास वानरे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आदरणीय केंद्र प्रमुख रविंद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सहकार्याने पार पडले आणि पहिल्या दिवसाची सांगता खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *