ताज्या घडामोडी

शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल विद्यार्थीयांचे होत आहे शैक्षणिक नुकसान 

शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल विद्यार्थीयांचे होत आहे शैक्षणिक नुकसान

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी नगर पासून ते जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच हनीफ मास्टर उर्दू शाळेकडे जाणाऱ्या ओबड धोबड रस्त्यावरून चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. कोणीही याकडे लक्ष देत नसल्यानं आम्ही करावं तरी काय? असा प्रश्न या चिमुकल्यांकडून विचारला जात आहे. ढाणकी गावाला पहिलेच कामचुकार नगर पंचायत कर्मचाऱ्यांनमुळे उन्हाळ्यात व पावसाळ्यात तीव्र पाण्याची टंचाई असते. त्यावर अश्या रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी त्रास होतो. ढाणकी हे गाव उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठा बाजार पेठ असेलेला गाव असून उमरखेड तालुक्यातून सगळ्यात जास्त कर ढाणकीतील नागरिक भरत असून सुद्धा ढाणकी गावा मध्ये आज ही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसून या कडे ना लोकप्रतिनिधी चा लक्ष आहे ना तहसीलदार यांच. शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल आजूबाजूला असलेल्या शेतीमुळं रस्त्यात येणारे साप या सगळया संकटाला तोंड देऊन विद्यार्थी कसेबसे शाळेत पोहचतात. तर काही पाय घसरून पडत असल्यामुळे त्यांना आपली शाळा बुडवून परत घरी जावे लागत असल्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर पाल्य संताप व्यक्त करत असून या रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थीयांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबून लवकरात लवकर रस्ता करून देण्याची मागणी करत आहे.अन्यथा जनआंदोलन उभा करुन विद्यार्थी शाळेत पाठविण्यात येणार नाही. होणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास ढाणकी नगरपंचायतला जबाबदार ठरवून ठीया आंदोलन करण्याच्या पवित्र्यात पाल्य असल्याचे बोलल्या जात आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *