ताज्या घडामोडी

उमरखेड / एसबीआय उमरखेड शाखेत रक्तदान शिबिर संपन्न

उमरखेड / एसबीआय उमरखेड शाखेत रक्तदान शिबिर संपन्न

उमरखेड प्रतिनिधी मिलिंद चिकाटे

 

भारतीय स्टेट बँकेला यावर्षी 70 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त एसबीआय च्या वतीने संपूर्ण भारतातून 70000 रक्त युनिट गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 70 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँक शाखा उमरखेड येथे बुधवारी एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साही सहभाग होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखेचे उपव्यवस्थापक केदार कोंडे यांच्या रक्तदानाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

भारतीय स्टेट बँक उमरखेड चे शाखा व्यवस्थापक प्रदीप फटिंग यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, ब्लड बँकेचे संचालक बालाजी चिंचोलकर, जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *