ताज्या घडामोडी

कृषि महाविद्यालय उमरखेड येथील कृषि दुतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शक!

कृषि महाविद्यालय उमरखेड येथील कृषि दुतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शक!

 

उमरखेड प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.

 

 

उमरखेड येथील कृषी महाविद्यालयतील कृषीदुतानी बियाणे उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यास शेतकऱ्याचा अनावश्यक खर्च कमी होऊन झाडांची सरासरी प्रमाण राहण्यात मदत होते. तरीही सर्व शेतकऱ्यांनी पेरणीअगोदर उगवण क्षमता तपासून पेरण्या करावे असे आवाहन करीत कृषिदूतांनी नागेशवाडी येथिल शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

मान्सून दाखल झालेला असून सर्व शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे. पेरणी योग्य पाऊस पुढील दोन-तीन दिवसात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उमरखेड तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून प्रमाणित व दर्जेदार बियाणे.

महत्त्वाचे झाले आहे. बियाणे नवे असो किंवा घरचे जूने पेरणीपूर्वी सदर बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अत्यावश्यक असल्याचे मार्गदर्शन कृषीदूत साहिल रोकडे, तेजस जाधव, श्रेयश गोविंदवार, वैभव काकडे, उत्कर्ष चव्हाण, कृष्णा ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या शंकेचे निराकरण केले. याकरिता प्राचार्य एस. के. चिंतले, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी ए. बी. इंगळे, वाय. एस. वाकोडे, ए. एस. राऊत तसेच विषय तज्ज्ञ डॉ. एस. बी. मातीखाये यांचे मार्गदर्शन लाभले. व तसेच गावातील सरपंच रामदास जटाळे उपसरपंच सौ.सीमा अनिल सुरोशे तंटामुक्ती अध्यक्ष विलास सुरोशे प्रगतिशील शेतकरी सुदर्शन सुरोशे ,शिवशंकर सुरोशे, कैलास पतंगे, संतोष सुरोशे, सुभाष सुरोशे, ज्ञानेश्वर सुरोशे, संभाजी सुरोशे, सुरेश कदम, आत्माराम सुरोशे, सुधाकर सुरोशे, व इतर गावकरी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *