माहूर : बस स्थानक बनले घाणीचे साम्राज्य. शहरातील नागरिक भाविक भक्तासह परवाशीयांचा आरोग्य धोक्यात.
नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.

माहूर बस स्थानक घाणीच्या विळख्यात सापडले असून, माहूरगड येथे येणाऱ्या भाविक भक्तासह, परवाशांच्या आरोग्यासह सोई सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गल्लीछ कारभाराला आगार प्रमुख आणि एसटी महामंडळाचे जिल्हा प्रशासन जबाबदार आहेत. बस आगाराच्या आवारात बसने प्रवास करणाऱ्या प्रवासी कडून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कॅरीबॅग व इतरही केरकचरा फेकल्या जातो. सदरील कचरा साफ करण्याचे सर्वस्व जबाबदारी संबंधित बस आगार यांची राहते. परंतु सदरील साफसफाई योग्य त्या पद्धतीने होत नसल्याने तथा सफाई कामगार नसल्याने आगार परिसरात घाणिचे साम्राज्य स्थापित झाले असावे. असा प्रश्न माहूरगडावर येणाऱ्या भाविकभक्तासह परवाश्यातून उपस्थित होत आहे. माहूर शहर तथा माहूरगड हे देवी देवतांचे माहेरघर असल्याने येथे संपूर्ण देशभरातील कानाकोपऱ्यातून भाविकभक्त मोठ्या आस्थेने येत असतात. तसेच माहूर लगत असलेल्या खेड्यापाड्यातून शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने बसचा प्रवास करत असतात. त्यामुळे भाविक भक्तासह शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांची बस स्थानकावर वर्दळ असते. मात्र माहूर बस आगार घाणीच्या विळख्यात असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आगारात शौचालय असतानाही स्वच्छता अभावी बहुतांश प्रवासी बाहेर उघड्यावरच लघुशंका करताना बरेचदा आढळून येतात. वरील सर्व बाबीमुळे प्रवासी खाजगी वाहनाने प्रवास करण्याचे मार्गअवलंबल्याने एसटी महामंडळांना याचा मोठा असा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य उलट होतोय की काय.? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. माहूरला येणाऱ्या देशातील कानाकोपऱ्यातील भाविक भक्तासह इतर परवाशांना कोणत्याही प्रकारचे हित आणि सुख मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच शाळेकरी विद्यार्थी/विद्यार्थिनींना तर तोंडावर रुमाल बांधूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी वैयक्तिक लक्ष घालून आगार परिसरात साचलेल्या घाणीचे कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. अशी ही मागणी भाविक भक्तासह, माहूरवासीयाकडून होत आहे. एकीकडे माहूर हे 33 कोटी देवी देवतांचे माहेरघर असल्याकारणाने कोट्यावधी रुपये खर्च करून प्रशासनाने भव्यदिव्य अशी इमारत उभी करून दिली. मात्र सुखसुविधे सह स्वच्छते अभावी या भव्य दिव्य इमारतीला गाल बोट लागल्याचे चित्र दिसत आहे.




