महागांव/कलगाव शिवारात हिस्त्र जनांवराचा हैदोस
तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर
कलगाव शिवारात काल रात्री गणेश राऊत यांचे गायीवर हिस्त्र जनावंराने हल्ला करुन ठार केले आहे या घटणा आधुन मधुन वाढत आसुन यापुर्वी सुध्दा कलगाव, अंबोडा, राहुर ,कंरजखेड, सवना शिवारात अशाच प्रकारचे हल्ले झाले त्यावेळी वनविभागास लेखी निवेदन देऊन सुध्दा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती पंरतु वनविभागाचे संबधीत आधीकारी ही बाब गांभीर्याने घेतांना दीसले नाही एखाद्या वेळी मनुष्यावर हल्ला झाल्यास सर्वस्वी वन विभागाचे आधीकार्यांना जबाबदार धरण्यात येईल असे शेतकरी नेते -गोविंदराव देशमुख (सवनेकर) यांनी यावेळी सांगितले आगोदरच शेतकरी अस्मानी आणी सुलतानी संकटाने मेटाकुटीस आला आणि त्यात हे पशुधनाचे नुकसान करणारे नवीन संकट पाहुन शेतकरी चितांतुर झाले आहेत तरी वन विभागाचे संबधीत आधीकार्यानी तातडीने अक्ष घालुन या जंगली जनावराचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही क्षणी पीडीत शेतकर्यानां घेऊन वन विभागाचे कार्यालया समोर शोले स्टाईल आंदोलन करु असे गोविंदराव देशमुख यांनी सांगितले