क्राईम डायरी

ढाणकी व कार्यक्षेत्रातील गाव खेड्यात दुर्गा उत्सव धमचक्र प्रवर्तन दिना निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न 

ढाणकी व कार्यक्षेत्रातील गाव खेड्यात दुर्गा उत्सव धमचक्र प्रवर्तन दिना निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

 

ब्यूरो रिपोर्ट /अजीज खान

 

पुलिस स्टेशन बिटरगाव अंतर्गत ओ.पी. ढाणकी येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड उमरखेड यांचे मार्गदर्शनात दिनांक १ ओक्टोम्बर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता आगामी नवरात्र उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन संबंधाने शांतता समिती सदस्य व दुर्गा मंडळ पदाधिकारी व धम्मचक्र प्रवर्तन रॅली पदाधिकारी

यांची सभा घेण्यात आली. सदर सभामध्ये मागील दिवसात मौजे ढाणकी येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दरम्यान झालेल्या घटनेबाबत चर्चा / मार्गदर्शन करून आगामी धम्मचक्र प्रवर्तन दिन व दुर्गोत्सव मिरवणूक दरम्यान असे प्रकार होणार नाही याबाबत सक्त सूचना देण्यात आले आहे. तसेच दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक ही विसर्जन मार्गानेच मिरवणूक काढतील मार्ग बदलणार नाही. दुर्गा विसर्जन मिरवणूक संबंधाने लावण्यात येणारे डी.जे. वाहन हे मिरवणूक मार्गाने फिरतील असे लावण्यात यावे जेणेकरून रस्त्यातील घराचे किंवा ईतर नुकसान होणार नाही, तसेच विसर्जन मिरवणूक मार्गातील अडचणी, विसर्जन मिरवणूक मार्ग, डी.जे. वाहन, मिरवणुकीत कोणीही दारू पिऊन येणार नाही, ऑनलाईन परवानगी दोन दिवसात काढावे, मिरवणूकमध्ये आक्षेपार्ह बॅनर, फ्लेक्सघेऊन कोणीही नाचणार नाही, मंडप डेकोरेशन करताना लाइटिंग रस्त्याने उंचावर व व्यवस्थित लावतील जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, तसेच डॉल्बी/लेझर लाईट बंदी असले. बाबत सांगून कोणत्याही धर्माचे

अथवा धर्मा विषयी आक्षेपार्ह गाणे वाजवीणार नाही याबाबत सक्त सूचना दिले व स्थानिक प्रशासनकडून व पोलीस प्रशासनाकडून योग्य त्या उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. सदर धम्मचक्र प्रवर्तन दिन व दुर्गोत्सव शांततेत, आनंदात पार पाडणे व कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन ठाणेदार संतोष मनवर यांनी केले.

बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष मनवर हे आपल्या पोलीस ठाण्याअंतर्गत गावात भेटी देऊन त्याठिकाणी शांतात समिती सदस्य दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते धमचक्र प्रवर्तन दिन साजरा करणारे भीम सैनिक यांच्या चर्चा करून गावात सण उत्सवा दरम्यान शांतात नांदावी कोणी जरी यामध्ये घोडा घालण्याचे काम केले तर त्याच्या वर कायदेशीर कार्यवाही करण्यात येई सर्वानी आपापले सण उत्सव आनंदाने साजरे करावे सर्वाना दुर्गा उत्सवाच्या धमचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन टिपूर्णे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन रवी गीते दत्ता कुसराम रोशन सरनाईक गजानन खरात यांनी केले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *