ताज्या घडामोडी

महागांव / आवासचा मंजुर निधी तत्काळ द्या नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन ,

महागांव / आवासचा मंजुर निधी तत्काळ द्या नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन ,

 

आमरण उपोषणाचा इशारा

 

 

मुख्यसंपादक/ एस के चांद यांची रिपोट

 

महागाव परंतु अद्याप भेटलाच नाही नसल्याने नगर पंचायत प्रशासनाने मुख्य अभियंता , राज्यस्तरीय समन्वय अधिकारी , प्रधानमंत्री आवास योजना , महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे आवास योजनेचा निधी मिळण्यासाठी पत्रव्यवहार करूनही त्याची कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याने महागाव नगर पंचायतच्या नगराध्यक्षा करुणा शिरबीरे , उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे , गटनेते रामराव पाटील नरवाडे , आरोग्य स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती प्रमोद भरवाडे , बांधकाम सभापती गजानन साबळे , नगरसेविका रंजना आडे , सुनीता डाखोरे , आशा बावणे , जयश्री नरवाडे , नगरसेवक परवेज सुरैय्या , विशाल पांडे , सुजितसिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देवुन पंतप्रधान आवास योजनेचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करून जर हा निधी तत्काळ उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . नगर पंचायत क्षेत्रातील पंतप्रधान लाभार्थींना घरकुल योजनेच्या घरकुल बांधणीसाठी मंजुर झालेला निधी अद्याप न मिळाल्याने नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करीत निधी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . महागाव नगर पंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेमध्ये प्रथम डीपीआर मध्ये २७५ व द्वितीय डीपीआर मध्ये ४० ९ असे एकुण ६७६ घरकुल मंजूर झालेले असतांना प्रथम डीपीआरमधील २७५ लाभार्थींना राज्य शासनाकडून १ कोटी १० लक्ष रुपये व केंद्र शासनाकडून १ कोटी ६४ लक्ष ४० हजार रूपये असा निधी मंजुर झाला होता . तो संपुर्ण निधी घरकुल लाभार्थींना देण्यात येऊन खर्च झाला तरीही यामधील राज्य शासनाचा १ कोटी ६५ लक्ष रूपये व केंद्र शासनाचा २ कोटी ४८ लक्ष १० रुपये अन्यथा उपोषण करू ” महागाव शहरातील पंतप्रधान डीपीआरच्या लाभार्थींच्या घराचे आवास योजनेच्या पहिल्या बांधकाम पूर्ण झाले आहे . त्यांचा शेवटचा हप्ता शिल्लक असुन दुसऱ्या डीपीआरच्या लाभाथींचे निधी अभावी घरकुलांचे कामे अर्धवट आहे . त्यामुळे त्यांना तत्काळ निधी मिळून त्यांची अडचण दूर होणे गरजेचे असल्याने शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा , अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू . रामराव पाटील नरवाडे , गटनेते नगर पंचायत महागाव . असा एकुण ४ कोटी १२ लक्ष रुपये निधी अद्याप प्राप्त झालाच नाही . तसेच द्वितीय डीपीआरमध्ये ४०१ लाभार्थींना घरकुल मंजुर झाले असुन त्या करीता राज्य शासनाचा ४ कोटी १ लक्ष रुपये व केंद्र शासनाचा ६ कोटी १ लक्ष ५० हजार रूपये असा एकुण १० कोटी २ लक्ष ५० हजार रुपये निधी मंजूर झाला .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *