आरोग्य ताज्या घडामोडी

यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा कार अपघातात ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना

यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा कार अपघातात ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना

 

मुख्य संपादक/एस.के.चांद यांची बातमी

 

यवतमाळ : दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी आहेत. त्यांच्यावर निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. अपघाताचे वृत्त कळताच यवतमाळातील वैद्यकीय क्षेत्राला जबर धक्का बसला. डॉ. पीयूष बरलोटा, डॉ. संतोष बोडखे, डॉ. मिनल काळे असे तीन कुटुंब यवतमाळातून २५ ऑक्टोबरला दुबई जाण्यासाठी हैदराबाद येथे पोहोचले. दुबईवरून ते मंगळवारी हैदराबादला परत आले. तेथून यवतमाळकडे येत असताना निर्मल जिल्ह्यातील सोन या गावाजवळ डॉ. पीयूष बरलोटा यांची कार एमएच-२९-बीपी-४२०० ही अनियंत्रित झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर ही कार धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये सोबत असलेल्या डॉ. मिनल काळे, अनिता बोडखे व इतर दोन मुले जखमी झाले. जखमींना तातडीने निर्मल येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *