महागांव: येथील शिव भोजन थाली पुर्ववत सुरु करणे बाबत.तहसीलदार साहेबांना निवेदन..
प्रतिनिधी / एस के शब्बीर..
महागांव तालुक्यामध्ये शिवभोजनाचा लाभ काही महिन्यापूर्वी गोर , गरीब , जनता. गरजू लोकांनी घेतला असून गावातील स्थानिक राजकारण व विनाकारण केलेल्या तक्रार अर्जामुळे गेल्या ४ ते ५ महिन्यापासून शिवभोजन थाली बंद झाली आहे . महागाव तालुक्या लगतचे सर्व खेड्यापाड्यावरून यामध्ये गरीब , गरजु , शेतकरी , विद्यार्थी व जनसामान्य जनतेला शिव भोजन ची चषक लावून. सामान्य गरीब जनतेचे आर्थीक नुकसान होत आहे यामध्ये त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे . वाढत्या महागाईच्या काळात गरजु नागरीकांना दिलासा म्हणून अल्पशा पेशामध्ये जेवण मिळत होते . परंतु महागांव तालुक्यात सदर शिवभोजन चे सेटर बंद दिसत असल्याने शिव भोजन थाली बंद दिसून येत असल्याने शिव भोजन चालू करण्यासाठी गरीब व आर्थीकदृष्ट्या दुर्बल , अपंग , मजुर , शेतकरी यांना महागाईच्या भस्मासुराला तोंड द्यावे लागत आहे . तरी . मे . साहेबांनी सदर विनंती अर्जाची सहानुभूतीपूर्वक दखल घेवून महागांव तालुक्यातील शिवभोजन थाली पुर्ववत सुरु करुन गरजु गरीब कुटूंबाना व गरजू नागरिकांसाठी वरील माहिती अनुसार शिव भोजन चालू करण्यात यावे. ही नम्र विनंती . तहसिलदार साहेब , तहसिल कार्यालय महागांव यांचे सेवेशी वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष पप्पू भाऊ कांबळे यांनी निवेदन दिले आहे निवेदन देताना. विजय लहाने ( जिल्हा प्रसिध्दी प्रमुख ) शेख अशपाक शेख आगा ( ता . अध्यक्ष ) विजयकुमार कांबळे ( जिल्हा प्रवक्ता ) शिध्दोधन दुमके ( ता.सचिव ) नफीस भाई ( ता . उपाध्यक्ष ) पप्पुभाऊ कावळे ( शहर अध्यक्ष ) आजीम शेख हे हजर होते