बँकेतील शेतकऱ्यांची कामे योग्य मार्गदर्शन करून करा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड.
नागोराव शिंदे हादगाव..
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईल त्वरित मंजूर कराव्यात आणि बँक दलाल मुक्त व्हावी यासाठी आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे योग्य मार्गदर्शन संबंधित बँक कर्मचारी करत नसून कुठल्याही फाईल या दलाला शिवाय पूर्ण होत नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
त्या अनुषंगाने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज दिनांक 3 9 2019 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथे निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईल येत्या 15 दिवसात निकाली नाही काढल्यास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथे बँकेसमोर ढोल बजाव आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड हादगाव तालुका कार्य अध्यक्ष विश्वजीत पाटील विदर्भ प्रमुख शिवाजी जाधव युवा तालुका अध्यक्ष पवन पाटील मोरे यांच्या स्वाक्षर्या आहेत. व निवेदन देताना भाणेगाव येथील सरपंच प्रतिनिधी सुदर्शन भाऊ आढाव सदस्य प्रशांत भाऊ उपस्थित होते.