ता.माहूर मौजे सायफळ येथे अँटी करोना कवच फोर्स ची स्थापना करण्यात आली.
(माहुरंगड)रुपेश मोरे :- Covid-19-करोना विनानु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथे ग्राम पंचायत व पोलिस पाटील हेमंत गावंडे यांच्या समक्ष अँटी करोना covid-19 फोर्स ची स्थापना करण्यात आली.व समस्त गावपातळीवर गावकर्यांना आव्हान सुद्धा करण्यात आले की बाहेर गावावरून आलेल्या लोकांना व गावातील लोकांना सोशल डिस्टसिंग व चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य केले आहे व ज्या नागरिकांनी या बाबीचे पालन न केल्यास त्यांना 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार असे आव्हान सायफळ येथील पोलिस पाटील व ग्रामपंचायत यांनी केले आहे.