भाजप युवा मोर्च्या प्रदेश अध्यक्ष कृष्णाराज महाडिक यांची भेट म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत रोहित वर्मा.
प्रतिनिधी ढाणकी मिलिंद चिकाटे
सध्या भाजपच्या ग्रामीणशक्ती संघटन अभियानअंतर्गत गावोगावी गाव तेथे भाजपची शाखा उभे करणे सुरु असून, भाजयुमोचे जिल्हाअध्यक्ष रोहित वर्मा यांच्या प्रयत्नाने सर्व गावात या उपक्रमात अनेक युवाशक्ती सहर्ष सहभागी होत आहेत, या अभियानात मिळालेलं यश प्रत्यक्षात प्रदेशअध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या प्रेरणेन मिळाले असून, त्यांची नुकतीच प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आमच्या सहकाऱ्यासह ग्रेट भेट होळीच्या पावन दिवशी झाली, भेटी दरम्यान अनेक विषयावर अर्धा तास सकारात्मक चर्चा झाली, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले, कार्यकर्ता हा भाजपाचा आधार असून, कार्यकर्त्यांची जपणूक भाजप करत असतो, कोणत्याही वेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहीन अशी ग्वाही यावेळी प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली, या भेटीने आम्ही कार्यकर्ता म्हणून भारावून गेलो, त्यांच्या मार्गदर्शनाणे आम्हाला प्रेरणा मिळाली,
सशक्त युवक – सक्षम संघटन – समृद्ध गाव!
संघटित युवा शक्तीच्या बळावर गावागावात कमळ अधिक बळकट करण्याचा संकल्प!रोहित वर्मा यांनी यावेळी बोलून दाखवला
कृष्णाराज धनंजय महाडिक यांचे अभिनंदन करतांना भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, नगरसेवक मल्हार चंद्रे, अन्य सहकारी साहिल चंद्रे, राम चंद्रे, धनराज वानखेडे, विष्णू फुल्लेवार




