ताज्या घडामोडी

ढाणकी शहरात नळ सजावटीचा विषय बनले पाऊस पडला तरी नळात पाणी येत नाही.

ढाणकी शहरात नळ सजावटीचा विषय बनले पाऊस पडला तरी नळात पाणी येत नाही.

 

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

 

पावसाळा असूनही, पंधरा दिवसांनीही नळाला पाणी येत नाही ही गोष्ट नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील बिघाड म्हणून मानावी का? आज ढाणकीजवळील नाले, नद्या आणि विहिरी पूर्ण क्षमतेने भरलेल्या असूनही, नगर पंचायतीची पाणी साठवण क्षमता अपुरी असल्याने आणि योग्य पाणी नियोजनाचा अभाव असल्याने गावात पंधरा दिवसांनीही नळाला पाणी येत नाही याची जबाबदारी कोणाची?

 

लाखो रुपये खर्च करून नगर पंचायत पाणीपुरवठा विभागामार्फत गंजेगाव पेनगंगा नदीतून नळाच्या पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुमारे सहा महिन्यांपासून सुरू आहे, परंतु ते आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. या कामात ढाणकी नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा नियोजनाचा अभाव आणि देखरेखीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, ढाणकी येथील महिलांना पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हे दुर्दैवी मानावे लागेल.

 

ढाणकी शहरातील प्रभाग १२ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा होत नाही.

पावसाच्या पाण्यामुळे गावातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत, पण नळाला पाणीपुरवठा होत नाही? मंग नगर पंचायत काय करत आहे? ढाणकीची पाणी समस्या सोडवण्यासाठी कोणी वाली आहे का?

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *