स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्याचे वडवणी येथे आयोजन.
विशेष प्रतिनिधी.महागाव पुसद गोपाल एच राठोड.

हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळावा वडवणी येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.इंद्रनील नाईक, यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माजलगाव मतदारसंघाचे आमदार मा.प्रकाशदादा सोळंके, वडवणीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे, शेषेराव जगताप, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, पोहरागडचे महंत शेखर महाराज, महाराष्ट्राच्या महिला आयोग सदस्य आणि शिवसेनेच्या मराठवाड्याच्या संपर्क प्रमुख अँड. संगिताताई चव्हाण यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना अँड. संगिताताई चव्हाण यांनी स्व.वसंतरावजी नाईक यांच्या दैदीप्यमान कारकिर्दीच्या आढावा समाजापुढे ठेवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त काळ पदभार असताना सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना अन्न व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे महत्व अधोरेखित केले.या वेळी बोलताना माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाशदादा सोळुंके यांनी जयंतीच्या निमित्ताने नाईक साहेबानी घेतलेल्या निर्णयाचा तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. नाईक साहेबानी पंचायत राज सुरू केले या मुळे ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा दृष्टिकोन वाढला, यावर मत व्यक्त केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून वसंतरावजी नाईक यांचा उल्लेख केला.शेवटी उद्घाटनपर भाषणात महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा.ना. इंद्रनील नाईक यांनी, स्व. वसंतरावजी नाईक साहेबांचे महाराष्ट्राचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. बंजारा समाजाला कागदोपत्री सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी मा.ना.इंद्रनील नाईक यांनी दिले. संधी ही जबाबदारी कोण पार पाडू शकते त्यालाच मिळते असे मत मंत्री महोदयांनी मांडले. काळ बदलत आहे समाजानी एकजूट करून राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबरीजी मुंडे, राजाभाऊ पवार, प्रेमदास राठोड, आप्पासाहेब पवार, मनोहर पवार, सखाराम आडे, राजेश चव्हाण यांच्यासह सर्व गोर बंजारा समाज बांधवांनी प्रयत्न केले.




