ताज्या घडामोडी

ढाणकी बिटरगावं पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सवा निमित्त गणेश मंडळाची बैठक संपन्न.

ढाणकी बिटरगावं पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सवा निमित्त गणेश मंडळाची बैठक संपन्न.

 

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:

 

 

 

पो स्टे बिटरगावं हद्दीतील दुरक्षेत्र ढानकी येथे गणेश उत्सव संबंधाने ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दि 11 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ल.

 

 

ढानकी येथील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची गणेश उत्सव संबंधाने बैठक घेतली. बैठकी मध्ये गणेश उत्सव काळात घ्यावयाची काळजी याबाबत सूचना दिल्या,प्रत्येक गणेश उत्सव मंडळानी गणेश स्थापने पूर्वी ऑनलाईन परवानगी काढून घ्यावी, गणेश मूर्ती ची स्थापन रस्त्यावर करू नये, गणेश मूर्ती समोरील देखावे व लाईट मोठे वाहने पास होतील असे पद्धतीने लावावे, जेथे गणेश मूर्ती स्थापन होणार आहे त्या जागा मालकाची परवानगी , नगर पंचायत ची परवानगी, विद्युत विभागाची परवानगी काढून घ्यावी, गणेश मूर्तीची उंची आपल्या गावातील रस्त्याने सहज पास होईल अशी असावी गणेश स्थापना मिरवणुकीत कोणतेही गणेश मंडळ कट आउट ठेवणार नाही, आक्षेपार्ह स्लोगन चे बॅनर लावणार नाही, बॅनर वर कोणत्याही प्रकारचा नंबर चा उल्लेख असल्याचे निदर्शनास आल्यास सदर मंडळावर तात्काळ कार्यवाही करून बॅनर नगर पंचायत कडून काढून घेण्यात येईल तसेच डिजे मुक्त मिरवणूक करण्याबाबत सूचना देऊन सर्वांना मार्गदर्शन केले, बैठकीला गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, बिट जमादार मोहन चाटे,जमादार रवी गिते,गोपनीय विभाग प्रकाश मुंडे यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *