यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे यांची निवड.
गोपाल एच राठोड यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी.
राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षह पदी हंसराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी मुंबई येथे पक्ष कार्यालयात करण्यात आल्या. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे यांना
नियुक्त करित त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष आनंद पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महागांव तालुक्यातील काळी (दौ.) सर्कल मधील पदाधिकारी यांनी या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन करित शुभेच्छा चा वर्षाव केल्या जातआहे.