ताज्या घडामोडी

माहूर / रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी अनिल वाघमारे गजानन भारती यांची निवड.

माहूर / रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी अनिल वाघमारे गजानन भारती यांची निवड.

 

माहूर प्रतिनिधी /

 

श्रीक्षेत्र माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीच्या नियमक मंडळाच्या सदस्य पदी अनिल वाघमारे तर कार्यकारी मंडळ समितीच्या सदस्य पदी माहूरचे पत्रकार गजानन भारती यांची निवड करण्याचे पत्र आमदार भीमराव केराम यांनी दिल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक के बी वाघमारे यांनी रुग्ण कल्याण समितीची बैठक दि 12 रोजी बोलावून आमदार पुरस्कृत प्रतिनिधी अनिल वाघमारे आणि गजानन भारती यांचा हृदय सत्कार केला

 

किनवट माहूरचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 28 /1/ 2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीचे पत्र देऊन भाजपाचे ओबीसी सेलचे प्रदेश सचिव तसेच रुग्ण कल्याण समितीमध्ये कार्यरत राहून हजारो रुग्णांना दिवस-रात्र सेवा देणारे अनिल वाघमारे यांचे सह धडाडीचे पत्रकार गजानन भारती यांची तात्काळ निवड करावी असे पत्र दिले त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाने माहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक के बी वाघमारे यांनी वरील दोन्ही मान्यवरांना पत्राद्वारे कळवून बैठकीस बोलावत त्यांचा हृदय सत्कार केला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ विपिन बाबळे यांचे सह सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिचारिका अधिपरिचारिका उपस्थित होत्या

रुग्ण कल्याण च्या सदस्य पदी अनिल वाघमारे आणि गजानन भारती यांची निवड झाल्याने पुढील कार्यकाळात त्यांच्या हातून ग्रामीण रुग्णालयात सुविधा वाढाव्यात आणि रुग्णांची सेवा व्हावी यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तसेच भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्तेकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *