श्रीक्षेत्र माहूर :देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञाना कडे वळा.गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांचे प्रतिपादन.
नांदेड प्रतिनिधी:गणेश राठोड
माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे उर्दू विभागाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल बनवून आणले होते या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञानाकडे वळावे असे आवाहन केले यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष अपील बेलखोडे तसेच मुख्याध्यापक आनंदराव वाठोरे यांचे सर्व शिक्षक उपस्थित होते

दि 22 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथे ईयत्ता 2 री उर्दू मध्यम च्या सर्व विद्यार्थ्यांनी वेग वेगळे गणित आणि विज्ञान चे मॉडेल बनून आणले. विद्यार्थ्यांनी एकूण 52 प्रकारचे मॉडेल बनवून आणत गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांना चकित केले यावेळी त्यांनी मॉडेल बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उर्दू विभागाचे वर्गशिक्षक मोहम्मद युनुस मोहंमद युसुफ कुरेशी यांनी सर्व विद्यार्थी कडून मॉडेल बनऊन घेतले तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मॉडेल एक्सिबिशन पार पडला यावेळी शाळा व्यव्थापन समिती चे अध्यक्ष अपील बेलखोडे उपाध्यक्ष निसार कुरेशी सदस्य डॉ जुनेद बावाणी मुख्याध्यापक संजय वाठोरे सुफी लियाकत अली अविनाश सर यांचे सह उर्दू मराठी विभागाचे सर्व शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते



